जतेत महिलेवर तलवारीने हल्ला | जागेच्या वादातून संशयिताचे कृत्य ; महिला गंभीर जखमी

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील जागेच्या वादावरून झालेल्या भांडणात एका महिलेवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी विजय सदाशिव कैकाडी(वय 45) यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शोभा हणमंत कैकाडी या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय जाधव यांच्यात व परशुराम कैकाडी यांच्यात अनेक वर्षापासून जागेचा वाद आहे.यामुळे वारवांर त्यांच्यात भांडणे होत होती.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास विजय जाधव हा मद्यधुंद स्थितीत परशुराम कैकाडी यांच्या लहान भावाच्या पाठीमागून धारदार तलवार घेऊन हल्ला करणार तेवढ्यात मुलाला वाचविण्यासाठी शोभा कैकाडी यामध्ये आल्या.


त्यात तलवारीचा वार थेट शोभा यांच्या पोटावर झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीसांनी विजय जाधव याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी परशूराम हणमंत कैकाडी यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक विनोद कांबळे करत आहेत.