खिलारवाडीच्या तरूणांचा विजापूर नजिक खून

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील खिलारवाडी येथील नाना लोंखडे या तरूणांचा संशयास्पद मृत्तदेह कर्नाटकातील विजापूर नजिक आढळून आला आहे.त्यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात‌ समोर आले आहे.याप्रकरणी नाना लोंखडे यांच्या मामाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत नाना लोंखडे हा सेट्रींग काम व पानपट्टीचा व्यवसाय करत होता.22 जून पासून तो बेपत्ता झाला होता.


त्याबाबतचा गुन्हा जत पोलीसात दाखलही झालेला आहे.
दरम्यान नाना लोंखडेचा मृत्तदेह कर्नाटकातील विजापूर हद्दीत आढळून आल्याने पोलीसांना संशय आल्याने त्यांनी कसून तपास सुरू केला आहे. यात मयत नाना लोंखडे यांच्या मामाने त्यांची गेम केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दरम्यान मामाला पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त असून प्रेमसंबधातून नाना लोंखडेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अजून पुर्ण तपास झाला नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.दरम्यान मृत्तदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.अधिक तपास जत पोलीसाकडून सुरू आहे.