आजपासून सर्व दुकाने उघडणार

जत,संकेत टाइम्स : राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगली जिल्हा ‌लेव्हल तीनमध्ये गेल्याने आजपासून अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.त्यामुळे जत शहरात गर्दी असळण्याची शक्यता आहे.तालुक्यात अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे पोलीसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गेल्या अडीच महिन्यानंतर सर्व दुकाने अधिकृत्त पणे सुरू राहणार आहेत.

 


जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे नियम पाळत सर्वच दुकाने सुरू करण्याचे आदेश काढले आहेत.त्यामुळे जत शहरासह तालुक्यातील दुकानदारांची रविवार उशिरापर्यत जुळवाजुळव सुरू होती.