जत तालुक्यातील कोरोनाबाधित आकडा उतरला,तिघाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात कोरोनाचा प्रभाव उतरणीला लागल्याचे स्पष्ट झाले असून शुक्रवारी जत तालुक्यात 26 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुत्यू होणारी संख्या काम असून आज पुन्हा 3 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.तालुक्यातील 73 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 670 रुग्ण उपचाराखाली आहेत.तालुक्यातील मुत्यू संख्या 245 वर पोहचली आहे.जत 2,शेड्याळ 1,को.बोबलाद 1,उमदी 1,उमराणी 1,बागलवाडी 2,हिवरे 7,कुंभारी 1,कासलिंगवाडी 1,कोसारी 1,सोरडी 1,सोरडी 1,सोन्याळ 1,येळवी 1,गोंधळेवाडी 2,खलाटी 2,बागेवाडी 1 एकूण 26 आढळून आले आहेत.