तालुक्यातील प्रत्येक शेतकरी समृध्द झाला पाहिजे ; आमदार विक्रमसिंह सांवत

जत,संकेत टाइम्स : मेंढीगिरी (ता.जत)येथील मेंढीगिरी सर्व सेवा सोसायटी इमारतीचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ककमरी गंगणं महाराज,माजी पंचायत समिती सदस्य मलेश कित्ती,माजी नगरसेवक निलेश बामणे, माजी सरपंच सुभाष बिराजदार,माजी सरपंच प्रकाश पाटील,सरपंच सौ.शोभा बिराजदार,उपसरपंच अजित कांबळे,सोसायटीचे चेअरमन कुमार जैन,व्हाय.चेअरमन पिराप्पा सरक,रविकांत पाटील,भीमराय बिराजदार,देवेंद्र बिराजदार,व ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले,सोसायट्या शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक आधार देणाऱ्या संस्था आहेत.त्या सक्षमपणे चालणे गरजेच्या आहेत.ग्रामीण भागातील या सोसायटी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत अर्थवाहिनी ठरत आहेत.आता तालुक्यातील जवळपास सर्व भागात सिंचन योजनेतून पाणी पोहविण्यात आले आहे.उर्वरित भागातही पाणी कसे सोडता येईल यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे.एकदा हमखास पाणी गावातील सोसायट्याची आर्थिक मदत यावर माझ्या तालुक्यातील प्रत्येक शेतकरी समृद्ध झालेला मला पाह्याचे आहे,असे उद्गार यावेळी आ.सांवत यांनी काढले.