पदवीधर युवकांचे प्रश्न सोडवू ; सचिन निकम

माडग्याळ, संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी माडग्याळ येथील युवा नेते सचिन निकम यांची निवड करण्यात आली.राज्याचे‌ नेते सुजीत थेटे यांनी हि निवड केली.
निकम हे या अगोदर संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत होते.


त्यांनी जिल्ह्यातील पदवीधर युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. परखड वक्तृत्व कौशल्य तसेच संघटनेची बांधणी करताना युवकांना एकत्र जोडण्याची,युवकांच्या प्रश्नावर सातत्याने लढा उभारण्याच्या त्यांच्या कामाची दखल राज्यातील नेत्यांनी घेत त्यांना या पदावर संधी दिली आहे.

सचिन निकम म्हणाले, संघटनेमध्ये काम करत असताना पदवीधर युवकांचे प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य राहिल.पदवीधर युवकांना बेरोजगार भत्ता,तसेच कोविड काळातील शैक्षणिक फी माफ करणे,पदवीधर युवकांना सर्व स्तरावर मदत उपलब्ध करून देण्याचा माझा यापुढे प्रयत्न राहिल.वरिष्ठांनी दिलेली संधीचे सोने करण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिल.

यावेळी विश्वजीत पाटील,दिपक बंडगर,धनाजी पाटील,अमोल मस्के,संदेश निकम,वैभव गायकवाड,रमेश कोरे,अंबादास चौगुले,रमेश चौगुले उपस्थित होते.