कुडणूर-शिंगणापूर रस्त्याने घेतला मोकळा श्वास | कॉग्रेस‌ नेते अभिजीत चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा

डफळापूर, संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील शेवटच्या‌ दोन गावांना जोडणारा शिंगणापूर-कुडणूर रस्ता काटेरी झुडपानी गायब झाला होता,अखेर या‌ रस्त्याकडेच्या काटेरी झाडे हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
नव्याने केलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे अगदी रस्त्यापर्यत वाढली होती.


त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत‌ नव्हती,त्याशिवाय दुचाकी स्वारांचे काटेरी वनस्पतीमुळे अपघात होत होते.ही झुडपे तातडीने काढावीत,अशी मागणी बाजार संचालक अभिजीत चव्हाण यांनी केली होती.


संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून संबधित ठेकेदाराकडून ही झुडपे काढली आहेत.त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून वाहन धारकांतून समाधान व्यक्त होत आहे.कुडणूर ते‌ शिंगणापूर रस्त्यावरील झुडपे हटविले.