घरासमोरून दुसरी दुचाकी पळवली,जतेत चोरट्यांची दहशत‌ कायम

जत,संकेत टाइम्स : जत शहरातून चोरी करणाऱ्या एक चोरटा अटक करूनही दुचाकी चोरी घटना थांबण्याचे नाव घेत नाही.गत आठवड्यात ‌बुलेटसह चार दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलीसांनी पकडले आहे.त्यामुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद बसेल असे वाटत होते. मात्र गेल्या दोन दिवसात पुन्हा दोन दुचाकी पळवून नेहल्या‌ आहेत.



शहरातील हनुमंत मुत्ताप्पा कोळी (रा.चाळवस्ती जत) यांची हिरो कंपनीची स्प्लेडर मॉडेलची दुचाकी(क्र.एमएच 10,सीझेड 5717) नेहमीप्रमाणे 31 मेला लॉक करून झोपी गेले असताना घराबाहेर दुचाकी चोरट्यांनी पळविली आहे.तर पुन्हा बुधवारी धनेश अनिल पट्टणशेट्टी,राहणार जत यांची स्प्लेडर प्लस एमएच 10/सीएस 1240 ही दुचाकी घराबाहेरून चोरट्यांनी पळविल्या आहेत.पोलीसाकडून अपेक्षित शोध‌ नसल्यात जमा आहे.दरम्यान नागरिकांच्या महागड्या दुचाकी पळविण्यावर चोरट्याचा डोळाआहे.