ध्येयनिष्ठ,कर्तव्य तत्पर प्रशासक ; अरविंद धरणगुत्तीकर

जत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याच्या थोडक्यात आढावा,
इचलकरंजी,ता.हातकलंगडे,जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असून, त्यांना दोन मुले आहेत,दोन्हीं मुले उच्च शिक्षित असून पहिला मुलगा अमरसिंह हे बँक ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. दुसरा मुलगा अभयसिंह अमेरिका येथे नामवंत कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.साहेबांच्या धर्मपत्नी सौ.सुरेखा मॅडम ह्या गृहणी आहेत. सर्व कुटुंब उच्च शिक्षित, सुसंस्कृत आहे.


साहेब कौटुंबिक जीवनात सुखी व समाधानी आहेत.अत्यंत प्रतिकुल परस्थितीत शिक्षण घेऊन ते 1990 ला चंदगड जि. कोल्हापूर येथे पंचायत समिती विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.तेथे त्यांनी प्रभावी काम करत शासनाच्या अनेक योजना तळागाळापर्यंत राबविल्या त्यामध्ये किमान सहा गावामध्ये प्रत्येकी सात कोटीचे जलस्वराज्य प्रकल्प राबवले. हातकणंगले जि.कोल्हापूर येथे तेरा वर्षे काम केले. या ठिकाणी सात कोटी रुपये खर्च करून सात गावात जलस्वराज्य योजना राबविली तर 62 गावे निर्मलग्राम शंभर टक्के करून तर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात निलेवाडी,पारगाव ही गावे केली बक्षिसास पात्र केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचा मानाचा असणारा शाहू पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांच्या शुभहस्ते देऊन गौरव करण्यात आला होता.तर सन 2003 ते 2004 या साली पुणे विभागीय आयुक्त यांच्याहस्ते ही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.



त्यानंतर आजरा पंचायत समितीमध्ये काम करीत असताना तालुका निर्मलग्राम केला. तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर कवटेमहांकाळ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना चांगले मार्गदर्शन करून वेगळी दिशा दिली. 
दोन वर्षांनी कवठेमहांकाळ येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.कवठेमंकाळ जिल्हा सांगली येथे गटविकास अधिकारी म्हणून पाच वर्षे 
प्रभावीपणे काम करत असताना त्याचवेळी तासगाव येथे एक वर्षे गटविकास अधिकारी म्हणून तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय.आर. आर.पाटील.


यांनी त्यांना काम करण्याची संधी दिली.त्या काळात त्यांनी कवठेमंकाळ व तासगाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी फार मोठी कामगिरी केली होती.अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.प्रत्येक गावात स्वच्छ पाणी कसे मिळेल,यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले होते.धरणगुत्तीकर यांचा आबाच्या हस्तेही सत्कार झाला होता.कवठेमहांकाळ तालुक्यातील  अग्रणी नदीला राजेंद्रसिंह राणा यांनी भेट दिले होती.त्यांच्या सोबत‌ त्यांनी अग्रणी नदी पुर्नजीवीत करण्यासाठी मोठे काम केले आहे.मंडणगड येथे बदली झाली त्या ठिकाणी खासदार अमर साबळे यांनी आदर्श संसद गाव दत्तक घेऊन सहा एकर जमिन जागा उपलब्ध करून दिली या ठिकाणी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले.


या सर्व कामाची दखल घेऊन प्रशासनाने दोन जादा वेतनवाढी साहेबांना दिल्या आहेत.पुढे जत समितीला त्यांची गटविकास अधिकारी म्हणुन नियुक्ती झाली.त्याला पावणेदोन वर्षे झाले असून कोरोनाच्या काळात सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व कोरोणाची चैन तोडण्यासाठी त्यांनी काम केले.जत पंचायत समितीमधील विस्कटलेली घडी सुरळीत केली व प्रशासन गतिमान केले,रखडलेल्या पाणी योजना पूर्ण केल्या,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या मदतीने तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत,माजी आमदार विलासराव जगताप,सभापती मनोज जगताप व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व अधिकारी पदाधिकारी यांना बरोबर घेऊन तालुक्यात 3 हजार 30 घरकुले पूर्ण करण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यामुळे अनेक कुंटुबियांना हक्काचे छत मिळाले.
आज अशा प्रदिर्घ अनुभव असलेले अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत,त्यांनी  सेवानिृत्तीनंतर ही आपल्या अनुभवाचा उपयोग विविध संघटनांना तशेत सामाजिक,शैक्षणिक कार्याला हातभार लावण्यासाठी करावा,त्यांना पुढील काळात दिर्घायुष्य लाभावे,हीच प्रार्थना.. 



भारत क्षीरसागर
अध्यक्ष,सर्व पदाधिकारी,जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ,(शि.द)