पाच्छापूरमध्ये ओढ्यातून वाहून जाणाऱ्या तीन महिलांना वाचविले

जत,संकेत टाइम्स : पाच्छापूर ता.जत‌‌ येथे वाहून जाणाऱ्या तीन महिलांना युवकांनी दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्न करत वाचविले.
वळसंग‌ येथे मजूरीसाठी गेलेल्या सात महिला काम आटपून घरी परतत असताना ओढाला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.


तरीही त्या महिलांनी ओढ्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला,त्यातील तिन महिला ओढ्याच्या मध्यावर जातच जोरदार  प्रवाहामुळे दोनशे फुट वाहून गेल्या.अन्य‌ महिलानी आरडा ओरडा केल्याने युवक गोळा होत त्यांना दोरीच्या साह्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून पाण्याबाहेर काढले.दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महिलांना पाण्याबाहेर काढण्यात आले.