संखचा अपर तहसीलदारसह तलाठ्यास दोन दिवस कोठडी | दोघाच्या‌ मालमत्तेची चौकशी होणार | लाचखोर अधिकाऱ्यांना वटणीवर आणू ; सुनिल पवार यांचा इशारा

जत,संकेत टाइम्स : संख येथे माती उत्खनन प्रकरणी पकडलेले वाहन सोडविण्यासाठी 2 लाख 30 हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या छाप्यात पकडलेला अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रेसह साथीदार विशाल उदगीर या तलाठ्यांला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.भ्रष्ट कारभाराने जत महसूलची अब्रु चव्हाट्यावर आणणारी घटना संख अप्पर तहसील कार्यालय परिसरात मंगळवार घडली आहे.
वळसंग येथील माती वाहतूक करताना पडलेला जेसीबी कारवाई न करता सोडविण्यासाठी संखचे अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी विशाल उदगीरे यांनी तब्बल अडीच लाख रूपयाची लाच मागितली होती.त्यातील दोन लाख तीस हजार रूपयाची लाच अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून स्विकारताना तलाठी विशाल उदगीर याला सांगलीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते.तेव्हापासून अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हा फरार झाला होता.अखेर बुधवारी म्हेत्रे लाचलुचपत विभागाच्या सांगली कार्यालयात स्व:ताहून हजर झाला.

दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.अनेक दिवसापासून संख अपर तहसीलदार कार्यालय भ्रष्ट कारभाराचा अड्डा बनला होता.येथील कार्यालयाचा प्रमुखच थेट लाच मागत असल्याचे लाचलुचपतच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे.


जत तालुक्यातील सर्वच कार्यालये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लुटीचे अड्डे बनविले आहेत.जतच्या बेजबाबदार लोकप्रतिनिधीच्या चुप्पीमुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांना दिवसा ढवळ्या लुटले जात आहे.
संख अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हा हजर झाल्यापासून या कार्यालयात एकही कागद वरून पैसे दिल्याशिवाय मिळत नसल्याचे आरोप होत आहेत.कार्यालय प्रमुखांने हा लुटीचा अड्डा बनविल्याने सर्वजणच मन मानेल तसे लुटत होते.वरदान ठरलेल्या भोर नदीपात्रातील काळे सोने या कार्यालयाला मोठी मलई देणारे साधन ठरले होते.महिन्याला कोट्यावधीचा वरकमाईचा कारभार या कार्यालयातून सुरू असल्याची चर्चा आहे.गौण खनिज हा महसूलचा पैसे देणारी कोबडी आहे,मात्र संखच्या तहसीलदाराने थेट कोंबडी कापण्याचे धाडस गेल्या काही दिवसापासून केले होते.त्यातूनच वंळसग येथील हा प्रकार त्यातलाच आहे.दरम्यान अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व तलाठी विशाल उदगीर यांच्या घरांची,बँक नोंदी,मालमत्तेची लाचलुचपत विभागाकडून पुढील काही दिवस तपासणी करण्यात येणार आहे.लुटीतील कोट्यावधी रूपयाचा कारभार उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

महसूलमधिल लुटीचा कारभार उजेडात आणू


जत तालुक्यातील कार्यालये येथे येणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना खाजगी मालमत्ता वाटू लागली आहे.ज्यांनी त्यांना वटणीवर आणण्याची गरज‌ होती,त्याच्या चुप्पीमुळे ते शिरजोर झाले आहेत. महसूल विभागात होणारी लुट उजेडात आणणार असून यापुढे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी असे प्रकार बंद करावेत अन्यथा त्यांना आम्ही 
त्यांना वटणीवर आणू असा,इशारा जत तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी दिला आहे.

संखचे अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांना अटक करून लाचलुचपतचे अधिकारी न्यायालयात नेहताना