गिरगावच्या मासिद्द खलाटे यांचा आंतरराष्ट्रीय लेख म्हणून गौरव

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील गिरगाव येथून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखक म्हणून झेप घेण्याची कौतुकास्पद कामगिरी मासिद्द खलाटे या विद्याथ्यनि केली आहे.बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) च्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मासिद्द याची 16 पुस्तके आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाली आहेत. 


इंग्रजीतील कविता संग्रहही त्यामध्ये आहेत. या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय लेखक म्हणून त्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
मासिद याने कन्नड माध्यमांतून शिक्षणाची सुरुवात केली.सातवीपासून त्याने लेखनास सुरुवात केली.बारावीपर्यंत जत तालुक्यात शिक्षण घेतल्यानंतर बी.एस्सी.साठी सांगलीतील कस्तुरबाई वालचंद, महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला.शिक्षण सुरू असतानाच त्याने सहा पुस्तके लिहिली.आंतरराष्ट्रीय संघाच्या नियतकालिकांसाठी संपादक म्हणून तो कार्यरत आहे. ऑर्थर पेजेस चेन्नईचा'यंग ॲचिव्हर ऑफ द इयर', इंडियन प्रोफेशनल अवॉर्डतर्फे 'क्रिएटिव्ह
रायटर ऑफ द इयर', असे अनेक पुरस्कार देऊन त्याला गौरविण्यात आले आहे.