जतेत सोमवारी पुन्हा नवे रुग्ण वाढले |हिवरे,कुंभारीत पाचपेक्षा जादा रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 38 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.यामुळे तालुक्यातील एकूण बाधित संख्या 10,901 झाली आहे.
सोमवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.मात्र वाढलेली नवी रुग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे.रविवारी दहाच्या आत आलेले रुग्ण सोमवारी पाचपट वाढून 38 वर पोहचले आहेत.43 जण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.480 रूग्ण सध्या उपचाराखाली आहेत.

विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेली जत,बिळूर,कुणीकोणूर शेगाव,डफळापूर आदी गावात कोरोना नियंत्रणात आला आहे.
जत 1,शेड्याळ 1,रेवनाळ 1,हिवरे 8,कुंभारी 5,शेगाव 3,आंवढी 2,गुळवंची 1,बेवनूर 1,वायफळ 1,


कुणीकोणूर 1,सिध्दनाथ 2,संख 2,दरबडची 1,उमराणी 2,बिळूर 1,बाज 1,अंकले 3,तिकोंडी 1 असे 38 नवे रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत.तालुक्यात कोरोना मुक्त होणारी टक्केवारी 93 आहे.