अतिप्रंसग घटनेतील संशयित अद्याप फरारीचं

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावातील वीस 
वर्षीय मतिमंद मुलगीवर एका‌ 50 वर्षीय‌ इसमाने अतिप्रंसग केल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल होऊन तीन दिवस होऊनही अद्याप संशयिताला अटक करण्यात पोलीसांना यश आलेले नाही.मद्यपी असलेल्या या इसमाकडून दिवसाढवळ्या मुलीच्या मदिमंद पणाचा फायदा घेत आमिष दाखवून अतिप्रंसग केल्याचा पिडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा जत पोलीसात दाखल आहे.त्याबाबत संशयिताचे नाव व गुन्ह्याचा माहिती माध्यमांना देण्यास गेल्या तीन दिवसापासून टाळाटाळ केली जात आहे.तपासअधिकारी बातम्या आल्यास संशयित फरारी होईल,असे सांगतात मात्र गेल्या संशयिताचा वावर अंकले परिसरातच असल्याची चर्चा आहे. मग त्याला अटक करण्यात तपास अधिकारी गंभीर का नाहीत,हाही संशोधनाचा विषय आहे.

दुसरीकडे पोलीसाकडून अशा संशयितांना अभय देण्याचे प्रकार आतापर्यत अनेकवेळा झाले आहेत.खलाटी ग्रामपंचायत अपहार प्रकरणातही असेच अभय दिल्याची चर्चा आहे.मिरवाड तलावातील अनओळखी मृतदेहाचा तपासही गुंडाळल्याची चर्चा आहे.