रासपची ताकत गावागावात वाढवा ; महादेव जानकर | जत तालुक्यात सलग दोन दिवस कार्यकर्त्यांच्या भेटी

जत : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांशी बांधिलकी जपण्याचे कार्य कायम ठेवले आहे, जत दोऱ्यावर आ.जानकर आले असताना निगडी बुद्रुक येथील रासप जत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पांडुरंग धडस यांच्या घरी मुक्काम करत,कार्यकर्त्यांच्या परिस्थिती जाणून घेतल्या.आ.जानकर यांनी जत तालुक्यात दोन दिवस दौरा केला,या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील व श्री.धडस सोबत होते. 


जत तालुक्यात कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतल्या,बालगाव मठाची मठपती अमृतनंद स्वामी यांची भेट घेतली,त्यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा केली. दौरा आटपून पांडुरंग धडस यांच्या घरी मुक्काम केला.तरुण बांधवांना व्यवसाय,अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत,महिलांना लघुउद्योग,बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करावे,


व्यसनाच्या आहारी जाऊ नये,निरोगी,सदृढ तरूणच देशाची परिस्थिती बदलू शकतो,उद्दिष्ट मोठे ठेवा,त्यासाठी रात्रन् दिवस एक करत यश मिळवा,असेही यावेळी तरूणांना मार्गदर्शन करताना सांगितले. 
तालुक्यात पक्षाची ताकत वाढली पाहिजे,येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी गेले पाहिजेत,असेही कार्यकर्त्यांना सांगितले.


जत दौऱ्यावर आ.महादेव जानकर यांनी पांडूरंग धडस यांच्या घरी मुक्काम केला.