अंकलगीतील तरूणांची खलाटीत गळपासाने आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील खलाटी येथील फॉरेस्ट हद्दीत अंकलगी येथील 22 वर्षीय युवकाने झाडाला गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.भिमराव राम चौगले(वय 22,रा.चौगुले अंकलगी)असे मयताचे नाव आहे.
याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, खलाटी गावाच्या हद्दीतील फॉरेस्ट हद्दीत गेल्या दोन दिवसापासून झाडीत एक दुचाकी उभी असल्याची स्थानिकाना दिसून आली होती.त्यांचा संशय आल्याने काही नागरिकांनी काही अंतरावर पुढे जावून पाहिले असता अंदाजे 22 वर्षीय तरूणाने झाडाला गळपास लावल्याचे दिसून आले.त्यांनी यांची कल्पना संरपच संतोष नाईक यांना दिली.नाईक यांनी याबाबत जत पोलीसाना कळविले.सोमवार ता.21 सकाळी दहाच्या सुमारास घटना उघडीस आली आहे.पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृत्तदेह खाली उतरून जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे.दरम्यान हा मृत्तदेह अंकलगी येथील भिमराव राम चौगले याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.भिमराव रवीवारी सकाळी सात वाजता 2 हजार घेऊन घरातून वाडीवर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला होता,तेव्हापासून तो गायब होता.नातेवाईकांनी भिमराव यांचा मृत्तदेह ओळखला आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास सहाय्यक फौजदार रूपनूर करत आहेत.