जत नगरपरिषदेमध्ये होलार समाजाला संधी द्या ; आबासाहेब ऐवळे

  जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषद मध्ये स्विकृत नगरसेवक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांनी होलार समाजाला संधी द्यावी,अशी मागणी होलार समाजाचे नेते आबासाहेब ऐवळे यांनी केली आहे.

आबासाहेब ऐवळे म्हणाले की, गेली तेवीस वर्षे होलार समाज जगताप यांच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे.साहेब तेथे होलार समाज अशी ताकद दाखवून दिली आहे. 

जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा लोकसभा तळागाळातील होलार समाज बांधव एकनिष्ठ जगताप यांच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे. तालुक्यात पंचवीस हजार मतदार संख्या आहे.त्याचा विचार होऊन होलार समाजाला न्याय द्यावा,अशी मागणी ऐवळे यांनी केले आहे.