तुम्ही आता माझी आमदार आहात,जगताप यांच्यावर कॉग्रेस नेत्याचे आरोप

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात होत असलेला विकास सहन होत‌ नाही म्हणून अभद्र युती करून माजी आमदार विलासराव जगताप आमदार विक्रमसिंह सांवत यांच्यावर बिनबुडाचे‌ आरोप करत आहेत.,त्यांच्या सत्ताकाळात भ्रष्ट कारभार करून मनरेगा बंद पाडलेल्या योजनेसह माजी आमदार जगतापाचीही इडीने चौकशी करावी,अशी मागणी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी कार्याध्यक्ष नाना शिंदे,विक्रम फांऊडेशनचे अध्यक्ष अँड युवराज निकम, निलेश बामणे,सलीम पाच्छापूर उपस्थित होते.बिराजदार म्हणाले,आमदार जगताप यांना पराभव सहन होत नाही.आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मोठ्या प्रमाणात विकास योजना आणल्या आहेत. त्यामुळेच त्यांचा पोटसुळ झाला आहे.आपणाला मतदारांनी संधी दिली होती.त्यामुळे आता आ.सावंत यांना विकास कामासाठी सहकार्य करा,असेही बिराजदार म्हणाले.

नाना शिंदे म्हणाले,तालुक्यातील प्रत्येक गावात सिंचन योजनेतून पाणी मिळावे म्हणून आमदार विक्रमसिंह सांवत मोठे प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुर्व भागातील गावांना पाणी देणे शक्य‌ असलेली कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे, त्यांचे फलित म्हणून आता दोन्ही राज्यांनी मिळून या योजनेसाठी सकात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यांचेही श्रेय भाजपा घेऊ पाहत‌ आहे.आमदार सांवत यांनी आणलेल्या विकास निधीतील आलेल्या विकास कामाची उद्घाटने करत आहेत.हे त्यांना शोभनीय नाही.व्यक्तीद्वेशासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबरोबर अभद्र युती केली आहे.आता आपण आमदार नाही आहात,ते लक्षात घ्या,असाही टोला शिंदे यांनी लगावला.
अँड.युवराज निकम म्हणाले,बाजार समितीवर माजी आमदार विलासराव जगताप ‌यांची सत्ता असताना त्यांनी समितीची जमीन विक्री केली होती. आमचे नेते आ.विक्रमसिंह सांवत यांनी बाजार समितीसाठी जमीन खरेदी केली आहे.त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार अथवा भ्रष्ट कारभार झालेला नाही.चालू बाजार भावाप्रमाणे सर्व व्यवहार झाला आहे.माजी आमदार जगताप हे अपयशी ठरलेले आमदार आहेत.म्हैसाळ पाणी योजनेतून माडग्याळला पाणी देणे शक्य असताना त्यांनी प्रथम विरोध केला आता पाणी येतय म्हटल्यावर आम्ही केल्याचे सांगत आहेत.त्यांना उद्घाटने करण्याची खरचं‌ आवड असलेतर त्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपावर उद्घाटने करून मिळतील म्हणून फलक लावावा.जत येथील पत्रकार बैठकीत बोलताना आप्पाराया बिराजदार, नाना शिंदे,अँड.युवराज निकम