जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ओसरला | रुग्ण संख्येतही घट

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात शनिवारी 53 जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर तब्बल तिनपट कोरोना मुक्त झाले आहेत.
त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे.
सध्या तालुक्यात 1227 रुग्ण उपचाराखाली आहेत.राज्य शासनाने केलेल्या अनलॉक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील चिंता काहीसी कमी झाल्याने दुकाने,उद्योगांना उघडण्यासाठी काही अटीनुसार परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे पुढील काही आठवड्यात जनजीवन पुर्व पदावर येण्याची आशा व्यक्त होत आहे.


आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण : 53 (जत 6,बिळुर 4, उमराणी 1,सोरडी 1, सनमडी 1, सिंगनहळळी 1,वाळेखिडी 2,बेवनूर 1, शेगाव 1,बालगाव 1, उमदी 1,खडनाळ 2, पाढरेवाडी 4,मोटेवाडी 1,संख 4, आंसगी जत 1,को.बोबलाद 3, बोर्गी बु.2,जालिहाळ बु 2, करेवाडी 1, जिरग्याळ 4, डफळापूर 2,मिरवाड 2,खलाटी 1, कंठी 1,बाज‌ 2)