माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली तुकाराम बाबा यांची भेट

0



जत,संकेत टाइम्स : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा राज्याचे माजी दुग्धविकास , मत्स्य व पशु संवर्धन विकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांची गोंधळेवाडी (संख) येथे शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली.






तुकाराम बाबा यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार केला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, अमोल कुलाळ, पांडुरंग धडस,अनिल थोरात उपस्थित होते. 

तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर यांनी गोंधळेवाडी येथील बाबा आश्रमात उभारण्यात येत असलेल्या श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिर कामाची तसेच बाबा जलच्या युनिटची पाहणी केली. 





बाबा जल मधून जे उत्पन्न मिळते त्यातून आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत असल्याचे तुकाराम बाबा यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी तुकाराम बाबा महाराज व माजी मंत्री महादेव जानकर यांच्यात जतच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. 

Rate Card

जानकर म्हणाले,तुकाराम बाबांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी काढलेली संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी ही ऐतिहासिक दिंडी होती. तालुक्यात अपघात झाल्यास, दुर्देवी घटना घडल्यास त्याला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तात्काळ मदत केली जाते हे मोठे कार्य आहे.






कोरोनाच्या मागील दीड वर्षाच्या काळात जतकरांना मोठा दिलासा दिला आहे. भविष्यातही तुकाराम बाबा यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे रासप सहकार्य करेल,अशी ग्वाही माजी मंत्री जानकर यांनी दिली.



गोंधळेवाडी येथे राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी हभप तुकाराम बाबा यांची भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.