उमराणीच्या ग्रामपंचायत सदस्या उषा अंभगे यांचे सदस्यत्व रद्द

जत,संकेत टाइम्स : उमराणी ता.जत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उषा बाळासाहेब अंभगे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी रद्द केले आहे.
अंभगे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तत्कार मनीषा यल्लप्पा अंभगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती.त्यावर झालेल्या सुनावणीत अंभगे दोषी आढळल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14(1)(ज-3) व 16 नुसार निकालाची समज देण्यात आली आहे.


उषा अंभगे यांचे सदस्य पद अपात्र ठरविण्यात आले असून ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी धारण केलेले सदस्यपद रिक्त झाले आहे.
त्याशिवाय हा निकाल मान्य नसलेस विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे 15 दिवसाच्या आत अपिल करण्यासही या निकालात  मूभा दिली आहे.