नगरसेवकपदी गोतम ऐवळे यांना संधी द्या ; राजाराम जावीर

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषद मध्ये स्विकृत नगरसेवकपदी होलार समाजाचे नेते गोतम ऐवळे यांना संधी  द्यावी,अशी मागणी होलार समाजाचे जत तालुका नेते व कुंभारीचे लोकनियुकत सरपंच राजाराम जावीर यांनी केली आहे.जत तालुक्यातील होलार समाज कायम भाजपा सोबत‌ राहिला आहे.यापुढेही राहिल.या सामाजाला नगरपरिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे.तालुक्याचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत शहरातील समाजाचे नेते गौतम ऐवळे यांनी संधी द्यावी.ऐवळे हे युवा नेते आहेत,त्याशिवाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत युवकांचा वर्ग आहे.त्याशिवाय खोकीधारक संघटनेच्या माध्यमातून ते अनेक प्रश्नासाठी आवाज उठवत आहेत.अशा नेत्याला ताकत दिल्यास ते पक्षासाठी अजून ताकतीने काम करू शकतात,असेही जावीर म्हणाले.