समता आश्रम शाळेसाठी व्हॉलीबॉल साहित्य प्रदान

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्याचे युवा नेते, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी उमदी ता.जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रम शाळेसाठी व्हॉलीबॉल साहित्य प्रदान केले,तसेच सोनलगी ता.जत येथील विठ्ठल गुराप्पा कांबळे यांचा मुलगा पुरात वाहून गेला होता,त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदतीचा धनादेश दिला.याप्रसंगी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश पाटील, 
कार्याध्यक्ष ॲड.बाबासाहेब मुळीक,सरचिटणीस बाळासाहेब पाटील,विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे,ॲड.चन्नाप्पा होर्तीकर उपस्थित होते.


उमदी ता.जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रम शाळेसाठी प्रतिक पाटील यांनी व्हॉलीबॉल साहित्य प्रदान केले.