फ्रंटलाईन वर्करना प्राधान्याने लस द्या !

वळसंग,संकेत टाइम्स : जत तालुका विविध औद्योगिक आणि वीज निर्मिती अंतर्गत अनेक कामगार अत्यावश्यक सेवे अधीन काम करतात तसेच विविध मेडिकल आणि सोबत दुग्ध व्यावसायिक, वीज निर्मिती अंतर्गत कर्मचारी यात विद्यूत पारेषण, महावितरण, तसेच महाराष्ट्र शासनच्या अधीन असलेल्या महामंडळ चालक, वाहक इ. अनेक व्यवसायीक इत्यादी त्या प्रवर्गात मोडतात.


शासन निर्णय असताना व फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण बाबत तरतूद असताना अनेक जणांना लस मिळत नाही आहे. लसीचा तुटवडा, आज नाही उद्याची उत्तरे, फ्रंटलाईन आज बंद आहे अशी उत्तर देऊन कामगारांना परत पाठवले जात आहे. कोरोना वरील लसीकरण जरी 45 वरील लोकांना प्रथम देण्याचे असले तरीही अत्यावश्यक सेवा अंतर्गत कामगारांना लस देणेबाबत शासन निर्णय आहे.45 वरील गटातील लोकांनी लसीकरण कडे तूर्तास पाठ फिरवली असून मोजक्या लोकांचे लसीकरण दिवसभरात होते, परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगाराना मात्र लसीकरण साठी येरझाऱ्या माराव्या लागत आहेत.विविध बँक कर्मचारी, शिक्षण संस्था सदस्य यांना प्रामुख्याने लस दिली जाते तर सोबत असणाऱ्या या वरील कामगारांचा नंबर कधी लागणार अशी प्रश्नचिन्ह घोंघावत आहेत. तरी दिवसाच्या नियोजीत लसीकरण मध्ये उपलब्ध असलेल्या प्रथम दर्शी कामगारांना लसीकरण द्यावे अशी मागणी कामगार यांच्यातून होत आहे. तरी प्रशासनाने या बाबत सूचना देऊन लसीकरण पूर्ववत सुरू करावी अशी विनंती कामगारातुन करताना दिसत आहे.