जत तालुक्याला वरदान ठरलेले 'कमल अर्थोपेडिक' सेंटर

जत,(राजू माळी) : जतसह सांगोला,अथणी सह आसपासच्या  रुग्णांना जत येथील कमल अर्थोपेडिक सेंटर वरदान ठरत आहे.माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या आचार,विचाराचा मोठा पगडा असलेले त्यांचे चिरंजिव डॉ.कैलास सनमडीकर हे हॉस्पिटल चालवत आहेत.
कोरोना काळात दीड वर्षात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यत 400 च्यावर रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेक गरीब रुग्णांना जीवदान दिले आहे.या रुग्णालयाचे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले असून नव्या उपकरणासह हॉस्पिटलचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. 
2020 मध्ये कमल अर्थोपेडिक सेंटरला महात्मा फुले योजना सुरू झाली. 
डॉ.सनमडीकर यांनी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस व डी.अर्थो ही पदवी संपादन केली.त्यांच्या पत्नी डॉ.सौ.वैशाली सनमडीकर यांनी बीएएमएस एम.डी. ही पदवी घेतली आहे.डॉ.कैलास सनमडीकर यांनी 21 डिसेंबर 1997 साली आपल्या आईच्या नावे कमल अर्थोपेडिक सेंटर सुरू केले. त्यांनतर 2001 साली या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यात रुग्णालय हे उमाजीराव सनमडीकर मेडिकल फौंडेशनची स्थापना करून हे रुग्णालय ट्रस्टअंतर्गत 2004 साली घेण्यात आले. त्याच बरोबर ट्रस्टच्या माध्यमातून एएनएम व जीएनएम हे नर्सिंग कोर्स हॉस्पिटल संलग्न कोर्स सुरू केले.तेथून पुढे सप्टेंबर 2010 साली जत सीटी स्कँन सेंटरची स्थापना करण्यात आली. 
जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशन मार्फत जत येथे सीटी स्कँन सेंटर सुरू आहे. त्याचे विस्तारिकरण व जागा बदल करण्यात आले आहे.नवीन 300 एमए डिजीटल एक्स-रे मशीन व जीई कंपनीचे ब्राईट स्पीड मशीन बाहेर देशातून आयात केले आहे.या सेंटर मध्ये सर्व प्रकारचे आजारांवरील स्कँनिंग करणे शक्य झाले आहे.हे सेंटर पूर्वी कॉलेज रोडवर होते. ते आता कमल अर्थोपेडिक सेंटर येथील निगडी कॉर्नर जवळील सातारा रोडवर प्रशस्त जागेत सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सर्व प्रकारचे स्कँनिंग मेंदू रोग, छाती व पोटाचे विकार, एचआरटीसी टेस्ट, तसेच सर्व प्रकारच्या अँनजिऑग्राफी जत शहरातच करण्यात येत आहेत. सर्व प्रकारचे एक्स-रे यांची तज्ञ रेडिओलॉजिस्ट मार्फत तपासणी व रिपोर्टिंग करण्यात येत आहेत. या सेंटरची 24 तास सेवा चालू आहे.यासाठी तीन शिफ्टमध्ये तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. 
     


कोरोनाची महामारी लक्षात घेता उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशन या संस्थेने प्रत्येक स्कँन साठी सामाजिक बांधिलकी म्हणून केवळ दोन हजार रुपये नाममात्र शुल्क ठेवले आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना झाला आहे. 
त्याशिवाय 25 बेडचे सुसज्ज असे ट्रॅामा सेंटर, दुर्बिणीतील शस्त्रक्रिया तसेच सांधा बदलीसाठी आवश्यक असणारे मॉड्युलर ऑपरेशन रूम सुसज्ज केली आहे. दोन ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी विभाग, दोन बेड आयसीयू विभाग, सी आर्म आय आय टीव्ही, पोर्टेबल एक्स- रे युनिट, स्पेशल रूम, स्त्री- पुरुष स्वतंत्र वॉर्ड, दोन कन्सलटिंग रूम आदी अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.मणक्याच्या शस्त्रक्रिया या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत होत्या.आता जतमध्ये या रुग्णालयात मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कोव्हिड लसीकरण केंद्रासाठी जतमध्ये कमल अर्थोपेडिक सेंटरची शासनाने निवड केली होती. या लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
डॉ.कैलास सनमडीकर यांना सांगलीच्या श्री फाउंडेशनचा उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर सनमडी ग्रामस्थांकडून 'सनमडी भूषण' हा पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून गुजरात भुंकपावेळी वैद्यकीय मदतीसाठी डॉ.सनमडीकर यांनी गुजरात जाऊन तेथील भूकंपग्रास्तांची मोफत वैद्यकीय सेवा केली. त्याबद्दल सोलापूर येथील गुजराती समाजाच्या वतीने गुजराती समाज सेवा पुरस्कार देण्यात आला होता. सध्या डॉ. सनमडीकर हे सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम पाहात आहेत. या अंतर्गत पाच निवासी आश्रमशाळा व दोन वसतिगृह सुरू आहेत. उमाजीराव मेडिकल फाउंडेशनचेही ते सचिव आहेत. फाउंडेशन अंतर्गत पब्लिक स्कुल, पॉलिटेक्निक शिक्षण व जलतरण केंद्र सुरू आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध शाळा- कॉलेजमध्ये 300 हुन अधिक व्याख्याने दिली आहेत. एड्स विषयावर व अपघात व प्रथमोपचार या विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच श्री. उमाजीराव सनमडीकर पतसंस्थेचे 
संस्थापक/अध्यक्ष आहेत.त्याचबरोबर जीवनरेखा रक्तपेढीचे संस्थापक व विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत. डॉ. सनमडीकर हे वैद्यकीय कार्याबरोबरच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्याच बरोबर त्यांच्या पत्नींची त्यांना चांगली साथ असून त्याही सिद्धार्थ शिक्षण संस्थेत संचालिका आहेत. तसेच उमाजीराव सनमडीकर मेडिकल फौंडेशन या संस्थेत संस्थापिका विश्वस्त म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे.


हॉस्पिटल, कैलास,वैशाली फोटो वापरून चारवर चांगली करा