चार वर्षानंतर या परिसराला मान्सून पुर्व पावसाने झोडपले

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत परिसरात मान्सूनपुर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
तब्बल चार वर्षानंतर जून महिन्यात या भागात पावसाचे आगमन झाले.
संख सह परिसराला गेल्या चार वर्षापासून मान्सून पुर्वचा पाऊसांने हुलकावणी दिली आहे.


त्यामुळे खरीपांच्या पिकांना फटका बसला होता.
यंदा बदलेल्या वातावरणामुळे जून महिन्यात या भागाला पावसाने झोडपून काढले आहे.त्याशिवाय यापुर्वी अवकाळीचा पावस पडल्यामुळे तलावातही पाणी साठा उपलब्ध आहे.त्यामुळे शेतकरी सुखावला असून यंदा खरीपाचा पेरा वाढणार उत्पादनातही वाढ होणार निश्चित आहे.