घोलेश्वर येथे शेळ्याच्या वाड्यात लांडग्याचा हल्ला,तीन कोकरे

जत,संकेत टाइम्स : घोलेश्वर ता.जत येथील तांबेवाडी येथील सैनाप्पा गुंडा तांबे यांच्या शेळ्या,मेढ्याच्या वाड्यात लांडग्याने हल्ला केला.त्यात तीन कोकरांचा मुत्यू झाला आहे.
जत तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात लांडग्याचा उपद्रव वाढला असून सातत्याने शेळ्या मेढ्यांच्या मुत्यू होत आहे.


या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगर,दऱ्या सारखा परिसर आहे.त्याशिवाय पुढे मंगळवेढा तालुक्यात असाच परिसर असल्याने लांडग्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यांच्याकडून अशा शेळ्या-मेंढ्याचा कळपावर हल्ला होत आहे.


बुधवारी सायकांळी सैनाप्पा व त्यांचा मुलगा विलास यांनी घरा पासून काही अंतरावर असलेल्या वाड्यात बांधली होती.मध्यरात्री लांडग्याने या वाड्यात हल्ला केला.त्यात दोन बोकड व एका पाटेचा मुत्यू झाला आहे. यात सुमारे तीस हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.वनअधिकारी ए.ए.मुसळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. दरम्यान वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी सैनाप्पा तांबे यांनी केली आहे.


कोकरांच्या पंचनाम्या प्रंसगी वनअधिकारी,शेतकरी