जतेत पुन्हा घरासमोरील दुचाकी पळविली

जत,संकेत टाइम्स : जत शहरात पुन्हा घरासमोरील दुचाकी चोरून नेहल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हनुमंत मुत्ताप्पा कोळी (रा.चाळवस्ती जत) यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,हिरो कंपनीची स्प्लेडर मॉडेलची दुचाकी(क्र.एमएच 10,सीझेड 5717) नेहमीप्रमाणे 31 मेला लॉक करून घरासमोरील अंगणात लावली होती.सकाळी उठून बघितले असता गाडी चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यांनतर त्यांनी पोलीसात धाव घेतली.जत शहरातील दुचाकी चोरीप्रकरणी नुकताच एक चोरटा पकडला आहे.तरीही पुन्हा दुचाकी चोरी करण्यात आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.