मजबूत रस्त्यामुळे दळणवळण वाढेल माजी ; आमदार विलासराव जगताप | संख-खंडनाळ रस्त्याचे भूमीपुजन

माडग्याळ,संकेत टाइम्स :
जत तालुक्यातील रस्ते मजबूतीसाठी माझ्या आमदार काळात सातत्याने पाठपुरावा केला आहे,त्यातील अनेक काम आम्ही मागणी केल्यानुसार प्रस्तावित करण्यात आली होती,आता त्या रस्त्याना निधी उपलब्ध झाले आहेत,असे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.
संख ते खंडनाळ या रस्ता कामाचे भूमीपुजन माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांच्याहस्ते करण्यात आले.त्यावेळी माजी आमदार जगताप बोलत होते.


जगताप म्हणाले,भाजपा सरकार काळात मी आमदार असताना या रस्त्याचा प्रस्ताव सादर केला होता.तत्कालीन सरकारने प्रस्ताव मंजूर केला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 10 लाख रूपये मंजूर झाले आहेत.


भाजपा सरकार काळात तालुक्यातील रस्ते मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.त्यामुळे तालुक्यातील मोठ्या संख्येने रस्त्याची कामे झालेली आहेत.संख-खंडनाळ रस्ता कामासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला होता.आता त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
तम्मणगौडा रवीपाटील म्हणाले,भाजपा सरकार काळात तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील अनेक दुर्लक्षीत रस्त्यासाठी निधी आणला आहे.त्यावेळी मंजूर झालेले रस्त्यासाठी आतापर्यत निधी मिळत आहे,त्यामुळे जगताप यांचा दुरदृष्टीपणा स्पष्ट होतो आहे.विरोधकांना अशा रस्त्याचे दुसऱ्यांदा उद्घाटने करण्याने काय साध्य होणार नाही,जनता सर्वकाही बघत आहे,असेही रवीपाटील म्हणाले.यावेळी आय.एम.बिराजदार,प्रा.आर.बी.
पाटील,हणमंत गडदे,सुभाष कांबळे,राजू पुजारी,कामाण्णा बंडगर,रामलींग पाटील,विठ्ठल सर्जे,राजू डफळे,कामाण्णा पाटील उपस्थित उपस्थित होते.


संख-खंडनाळ रस्त्याचे भूमीपुजन माजी आमदार विलासराव जगताप,तम्मणगौडा रवीपाटील यांच्याहस्ते करण्यात आले.