वारकरी भवनसाठी सहकार्य करू ; आमदार विक्रमसिंह सांवत

जत,संकेत टाइम्स :  जत तालुक्यामध्ये  अध्यात्म परंपरा रूजावी,वारकरी सांप्रदायाची नव्या पिडीला शिक्षण मिळावे म्हणून जत तालुक्यात वारकरी भवन/गुरुकुल शिक्षण पध्दती सुरू व्हावी म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांना निवेदन देण्यात आले.जत‌ तालुक्यात अलिकडच्या काळात भरकटत‌ चाललेल्या युवा पिडीला अधात्माच्या छताखाली आणून चांगले संस्कार करण्याची गरज आहे.
तालुक्यातील युवकांना सध्या अध्यात्माची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदाय काम करत आहे.जतेत ही परंपरा रुजविण्यासाठी वारकरी भवन/गुरूकुल शिक्षण पध्दती सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे,असे जिल्हाध्यक्ष हभप नंदू महाराज तडसरकर यांनी सांगितले. 


त्याअनुषंगाने आम्ही आमदार विक्रमसिंह सांवत यांना भेटून याविषयी सकारात्मक चर्चा केली असून आ.सांवत यांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन  दिल्याचेही तडसरकर यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष हभप महादेव महाराज साळे निगडीकर,निगडीचे संरपच वैभव कोळी,विठ्ठल चव्हाण, तसेच तालुक्यातील अन्य वारकरी उपस्थित होते.जत येथे वारकरी भवन उभारावे,यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांना निवेदन देण्यात आले.