सावकाराने शेतकऱ्यांची जमीन बळकावली | बिरनाळ येथील घटना ; तालुक्यात पुन्हा सावकारांंचा डंक

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सावकारी डंक पुन्हा बळावला आहे.पोलीसाच्या दुर्लक्षामुळे सावकारांनी ऐन कोरोना काळात‌ बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी,जनावरे,किंमती वस्तू बळकाविण्याचे प्रकार तालुकाभर वाढले आहेत. नुकतीच बिरनाळ येथील व्याजाने दिलेल्या पैसे वसूलीसाठी रामदास महादेव लोहार(रा.बिरनाळ) या शेतकऱ्यांची दोन एकर जमीन खाजगी सावकार काशीराम आबा बंडगर,व कुमार काशीराम बडंगर (रा.बिरनाळ) यांनी बळकावळी होती.व्याजाने घेतलेले पैसे अव्वाच्या सव्वा व्याजाने वाढवून ते‌ वसूलीसाठी या दोघा सावकारांने स्व:ताच्या नावावर करून घेतली आहे.
त्यापुढे जात या सावकारांनी शेतकऱ्यांला पैसे परत कर नाहीतर बघून घेतो म्हणून धमकाविले आहेत.शेतकरी रामदास लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा सावकारा विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


रामदास लोहार या शेतकऱ्यांने काशीराम बंडगंर याच्या कडून एक लाख दहा हजार घेतले होते.त्याबदल्यात सावकाराने जमीनचे बक्षीसपत्र करून खरेदी घेतली आहे.घेतलेली रक्कम दिल्या नतरं तुझी जमीन परत देतो असे आश्वासन दिले होते.चार दिवसा पूर्वी महादेव लोहार हे काशीराम बंडगंर यांच्या कडे गेले तुमचे पैसे घ्या आणि माजी जमीन मला परत द्या असे‌ सांगितले,मात्र त्या सावकाराने व्याजासकट सव्वीस लाख रुपये दिले तरच तुझी जमीन देतो नाही तर तुला काय करायचे ते करुन घे म्हणुन धमकी दिली.

अखेर महादेव लोहार या शेतकऱ्यांने जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काशीराम बंडगर व कुमार बंडगंर या पिता पुत्र सावकार विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान तालुकाभर अशा खाजगी सावकारांनी धुमाकूळ घातला आहे.अनेक गावातील शेतकऱ्यांना अशा सावकारांचा डंक बसला आहे. मात्र बदनामी,बळाचा वापर हे सावकार करत असल्याने पोलीसापर्यत तक्रारी करण्यात शेतकरी घाबरत आहेत,त्यामुळे सावकार सुसाट आहेत.