वीज कनेक्शन तोडू नये ; सुभाष पाटील

जत,संकेत टाइम्स : महावितरण कार्यालयाकडून थकीत वीज बिलाची वसुली व त्या पोटी विद्युत जोडणी ही तोडली जात आहे.सध्या कोरोनामुळे सर्व नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत,त्यांना व्यवस्थित सावरू द्या,अन्यायकारक वीज कनेक्शन तोडू नये,अशी मागणी युवा नेते सुभाष पाटील(संख) यांनी केली आहे.

महावितरण कार्यालयाकडून वायरमनमार्फत थकित वीज बिलाची वसुली केली जात आहे. त्याचबरोबर प्रसंगी ग्राहकांची वीज तोडली जात आहे. त्यामुळे कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे.त्यामुळे वीज तोडणी करू नये. वीज ग्राहकांना वीज बिलाचे टप्पे करून द्यावेत, अशा विविध मागण्या केल्या.