जत‌ तालुक्यात नवे सात रुग्ण,एकाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्णांची दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक नव्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे.रविवारी तालुक्यात फक्त 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत.


दुर्देवाने एका रुग्णाचा पुन्हा मुत्यू झाला आहे.42 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 485 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.
तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट मोठ्या प्रमाणात खाली आल्याचे चित्र रविवारी दिसून आले.दरम्यान आजपासून तालुका चौथा स्तरात गेल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे रुळावर येत असलेले अर्थचक्र पुन्हा कोलमडणार आहे.जत 2,वाळेखिंडी 2,खलाटी 2,अंकले 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.