स्विकृत्त नगरसेवक पदासाठी ही तीन नावे सर्वाधिक चर्चेत

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील भाजपचे स्विकृत्त नगरसेवक उमेश सांवत यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या नगरसवेक पदासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांचे विश्वासू गौतम ऐवळे,पाप्पा कुंभार,मिथून भिसे या तिघांची नावे चर्चेत आहेत.मात्र अतिंम निर्णय माजी आमदार जगताप यांचा असणार आहे.नुकतीच भाजपचे नगरसेवक नेत्याची बैठक झाल्याचे कळते.
जत शहरात माजी आमदार विलासराव जगताप यांनी गत निवडणूकीत चांगले यश मिळवत 7 नगरसेवक निवडून आणायची किमया साधली होती.
त्यामुळे एक स्विकृत्त सदस्य निवडण्याची संधी भाजपला मिळाली होती.प्रांरभी आमदार जगताप यांचे कट्टर व विश्वासू उमेश सांवत यांना संधी मिळाली होती.विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही नगरसेवक आहेत.नगरपरिषद इतिहासात ते पहिले नगरसेवक दांपत्य ठरले होते.दरम्यान ते तिन वर्ष या पदावर होते.मात्र डिसेंबर 2022 ला नगरपरिषदची निवडणूक येऊ घातली आहे.या अनुषंगाने राजकीय रणनिती ठरविण्यासाठी पक्षातील नव्या चेहऱ्यांला संधी देण्यासाठी‌ उमेश सांवत यांनी जगताप यांच्या आदेशावरून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे या स्विकृत्त पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे‌ पाहणे यांची उत्सुकता लागली आहे.
सध्या तीन नावे चर्चेत आहेत.त्यात गौतम ऐवळे हे माजी आमदार जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत,शहरातील खोकी धारक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत.त्यांनी युवकांचे मोठे व मजबूत संघटन केले आहे. शहरातील मोठे नाव म्हणून ऐवळे यांच्याकडे बघितले जात आहे.भाजपाच्या युवा आघाडीचे सध्या ते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
दुसरे इच्छूक पापा कुंभार हे शिवनेरी गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून मोठा संपर्क असलेले नेते आहेत.गतवेळी त्यांच्या पत्नी नगरसवेक होत्या.त्याशिवाय भाजपच्या मध्यमवर्गीय फळीचे ते नेतृत्व करतात.त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो.
तीसरे इच्छूक मिथून भिसे हे युवा नेते आहेत.युवकांचा मोठा वर्ग त्यांच्या भोवती आहेत.भाजपाच्या तरूण पिठीचे ते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.मात्र अतिंम निर्णय माजी आमदार जगताप हे घेण्यात आहेत.त्या अनुषंगाने त्यांनी अन्य पदाधिकारी, नगरसेवकांची बैठकही घेतल्याचे समजते.