कोणत्याही चौकशीसाठी तयार‌ | आमदार विक्रमसिंह सांवत ; पाच वर्षात तुम्ही काय केले,आत्मपरिक्षण करा

जत,संकेत टाइम्स : माजी आमदारांनी पाच वर्षात काय यांचे आत्मपरिक्षण करावे,आम्ही दोन वर्षात तालुक्याचा कायापालट केला आहे,त्यामुळे हतबल झाल्याने असे‌ बेताल आरोप विरोधक करत आहेत,मी कोणत्याही चौकशीला तयार आहे,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


सांवत म्हणाले,गेल्या पाच वर्षात तत्कालीन आमदार जत शहरासह तालुक्याचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत,ते लपविण्याचा त्यांचा केविलवाणी प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील जनतेनी त्यांना एकवेळी संधी दिली होती,ती संपली आहे,मला पुढे संधी द्यायची का नाही हे जनता ठरवेल,त्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी सांगण्याची गरज नाही.
गत पाच वर्षात नगरपरिषदेला निधी देण्यास दुजाभाव केला,पाणी योजना,रस्ते अशा अनेक विकास योजनात त्यांनी काय केले,त्यात किती भ्रष्टाचार केला यांचे आत्मपरिक्षण करावे,


तालुक्याचा विकास करणे माझे‌ स्वप्न आहे.ज्यांना ते जमले नाही,त्यांना जनतेनी बाजूला केले आहे.बिनबुडाचे‌ आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय नाही,मी कोणत्याही प्रकार भ्रष्ट कारभार केलेला नाही,त्यामुळे इडीच काय अन्य कोणत्याही चौकशा लावा आम्ही तयार आहोत,असेही आ.सांवत म्हणाले.