माडग्याळमध्ये नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन

माडग्याळ,संकेत टाइम्स :
माडग्याळ ता.जत येथील तानाजी जाधव व डॉ.प्रकाश सावंत यांच्या मालकीच्या  नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन जतचे आमदार विक्रमसिंह सांवत व केंद्रीय रेल्वे बोडाचे संचालक प्रकाशराव जमदाडे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक विठ्ठल निकम,सरपंच इराणा जत्ती,नगरसेवक निलेश बामणे,महादेव अंकलगी,काँग्रेस युवा नेते गणी मुला,सोसायटी चेअरमन श्रीशैल माळी,आंसगीचे सरपंच श्रीमंत पाटील,साहेबराव टोणे,सिताराम गायकवाड,मौलार मणेर,डॉ.प्रदीप शिंदे , डॉ.रविकुमार बुध्याळ,पत्रकार रमेश चौगुले,सुनील घाटगे,केराप्पा हुवाळे, लिंबाजी माळी,गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की,जत तालुक्यात होत‌ असलेल्या अशा नव्या उद्योगामुळे बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळत आहे.माडग्याळ येथे या पंपामुळे दहा-पंधरा तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याशिवाय नामांकित ‌कंपनीचे स्वच्छ पेट्रोल,डिजेल येथे उपलब्ध झाले आहे.नागरिकांना त्यांचा फायदा होईल.


माडग्याळ ता.जत येथील नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन करताना आ.विक्रमसिंह सांवत,प्रकाशराव जमदाडे आदी