बँकेत आपला निभाव लागणार नसल्याचे‌ दिसताच बिनबुडाचे आरोप ; धरेप्पा कट्टीमनी

जत,संकेत टाइम्स : पुरोगामी सेवा मंडळाने अर्थात शिक्षक समितीने सभासदांच्या हिताच्या अनेक निर्णयांचा धडाका सुरूच ठेवल्याने विरोधकांनी आपल्याला निवडणुकीत कोणताच मुद्दा शिल्लक राहणार नाही.या भीतीने 28 जूनला सहकार आयुक्तांचे मासिक कायम ठेवीच्या संदर्भात तसेच काही पोटनियम यांच्या संदर्भात परवानगी आलेली पाहुन नमस्कारच्या नावाखाली काहीतरी चमत्कार घडेल या आशेने आंदोलनाची नौटंकी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, तो गळून पडेल या भीतीने  या संघ भक्तांना आंदोलनाची आठवण झाली,असा आरोप शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी केला आहे.


कट्टीमनी म्हणाले, काही जणांनी पाचनंतर तर काहींनी सहाच्या नंतर पोस्ट ऑफिस गाठले तर काहीजणांनी रात्री आठ नंतर हे आंदोलन केले,हे समजण्या इतपत सुज्ञ सभासद दुधखुळे नाहीत.पुरोगामी सेवामंडळाच्या सर्व निर्णयावरती सभासद समाधानी आहेत.भविष्यात सुद्धा शिक्षक समितीच सर्व सभासदांना न्याय देऊ शकते यावर ठाम विश्वास असल्याने विरोधक हवालदिल झाले आहेत,म्हणूनच बिवबुडाचे आरोप करीत आहेत.परंतु येणाऱ्या काळात यापूर्वी जशी त्यांना त्यांची जागा सभासद दाखवतील.व त्याच खड्यासारखे करतील यात तिळमात्र शंका नाही.
पुरोगामी मंडळाने घेतलेले काही प्रभावी निर्णय ; संघाच्या काळात वाढविलेली शेअर्स कपात 6 टक्के वरून 5 टक्के केली आहे.


सलग दोन पंचवार्षिक मध्ये मासिक कायम ठेवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.हजारो सभासदांना फक्त 200 रु स्टँप ड्युटी करून लाखो रुपयांची बचत केली.सत्ताकाळात एकदाही कर्जाचा व्याजदर न वाढवता तो कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला.मृत संजीवनी ठेव योजनेतून कर्जदार सभासद दुर्देवाने मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये पर्यत कर्जमाफी व बिगर कर्जदार सभासद वारसांना 3 लाख रु पर्यंतची मदत दिली जात आहे.दुर्देवाने डीसीपीएस धारकाचा अंत झाला तर 5 लाखापर्यंतची मदतीची तरतूद करण्यात आली आहे.शिक्षक बँकेत आरटीजीएस/एनईएफटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 


शिक्षक बँक कर्मचारी आकृती बंध 175 वरून 150 केला.गेली दहा वर्षे शिक्षक भरती नसलेले आपल्या शिक्षक बँकेचा कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा आर्थिक उन्नतीचा मार्ग कामधेनूच्या माध्यमातून उपयोग होऊ लागला,असा प्रभावी निर्णय पुरोगामी मंडळाने घेतले आहेत.त्यामुळे पुढची सत्ताही आमच्याकडेच राहिल,असे कट्टीमन्नी म्हणाले.