जतेत तिसरी आघाडी | अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित ; प्रस्तापिताविरोधात लढा उभारणार

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेच्या माध्यमातून जत शहराचा विकास करण्याऐवजी जत शहरासह तालुक्यातील ठराविक पक्षाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते हे सुडबुध्दीचे राजकारण करित असल्याने जत शहराचा विकास मागे पडला आहे.त्यामुळे जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा‌ नाराज गट,आरपीआय आठवले गट,मनसे,वंचित बहुजन आघाडी व प्रहार संघटना एकत्र आल्या आहेत. 
जत तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे,रासप,आरपीआय.आठवले गट, प्रहार हे पक्ष व संघटना कार्यरत असून यापैकी राष्ट्रीय काँग्रेसचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सवते सुभे आहे. 


त्यातच भाजप अंतर्गत मोठा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत.त्यामुळे भाजपवर नाराज असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या आपल्या पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात आज जत नगरपरिषदेचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्या फार्महाऊसवर करण्यात आली.यावळी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विवेक कांबळे,जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.रविंद्र आरळी, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बैठक पार पडली.


या बैठकीत आगामी होणारे जत नगरपरिषदेच्या निवडणूकीत तिसरी आघाडी करून या आघाडीचे अधिकृतपणे नोंदणी करून पक्षविरहित निवडणूका आगामी काळात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
त्याचप्रमाणे या आघाडीत समाजातील डाॅक्टर, वकिल,इंजिनिअर, व्यवसाईक आदी सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले.
त्याच प्रमाणे पुढील बैठकित समाजातील नाराज कार्यकर्ते यांना बोलावण्याचे व आघाडीला स्वतंत्र असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत नगरसेवक विजय ताड,कृष्णा कोळी, कृष्णा तळेकर,भाजपचे नाराज पदाधिकारी माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, तसेच किरण शिंदे, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, भीमराव देवकर,डाॅ.प्रविण वाघमोडे,वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोल साबळे,प्रहार संघटनेचे सुनिल बागडे यानी आपली भूमिका मांडली. 
या बैठकीत जत नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांची विकास कामे होत नाहीत.


तसेच नगरपरिषदेच्या कारभाराविषयी तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीला डॉ.रविंद्र आरळी,विवेक कांबळे,संजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले.अरूण आठवले,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


 जत येथील तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला उपस्थित नेते