कोरोना संपलेला नाही,खबरदारी घ्या आप्पासाहेब कोळी ; व्यापाऱ्यांची बैठक

जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या चढउतारामुळे प्रशासन चिंतेत असून जत शहरासह तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टट सर्व व्यापारी बांधवांनी अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चार पर्यंतच आपला व्यवसाय करावा अन्यथा नियम न पाळणारे व्यवसाईकांची दुकाने सिल करून त्यांच्यावर कोविड साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असा इशारा पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी दिला.जत शहरासह तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असतानाच व प्रशासनाने लाॅकडाऊनचे कडक निर्बंध शिथील केल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सांगली जिल्हा हा तिसऱ्या टप्प्यात येत असल्याने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सर्व व्यवसाईकांना अत्यावश्यक सेवा,हाॅस्पीटल,मेडीकल दुकाने व दूध डेअरी वगळता सर्व अस्थापना सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मूभा दिली आहे.मात्र जत शहरात दुपारी चारनंतरही प्रमुख बाजारपेठेतील सर्वच दुकाने उघडी असतात.दुकानदारांकडून किंवा ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. शहरात नागरिकांची व वाहनधारकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे,परिणामी कोरोना रुग्ण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे कडक पालन करण्याच्या सुचना दिला.परिस्थिती बिघडल्यास त्यांचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील, कोरोना संपलेला नाही,मास्क,सोशल डिस्टसिंग पाळण्यात हलगर्जी पणा करू नका,अशा सुचना दिव्या.
यावेळी किरण बिज्जरगी, पांडुरंग बामणे, प्रविण पोतदार म्हणाले, आम्ही नियम पाळत आहोत,काहीजण बेजबाबदार पणा करत आहेत.


त्यांच्यावर कारवाई करावी,नियम पाळण्याची सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी शितल तोष्णीवाल,अरविंद ओसवाल,पटाईत,साळे,आदी व्यवसाईक उपस्थित होते.


जत पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीवेळी उपस्थित व्यापारी