सांगली जिल्ह्यात मंगळवारी 969 नव्या रुग्णांची नोंद

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 969 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 14 रुग्णाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.807 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रभाव स्थिर असून 900 ते 1000 च्या दरम्यान दररोज नवे रुग्ण आढळून येत आहेत.


मंगळवार अखेरपर्यत ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 8,908 वर आहे.
जिल्ह्यात 1 लाख 44 हजार 793 नोंद झाली आहे. त्यापैंकी 1 लाख 31 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत.म्युकर मायकोसिस ; मंगळवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.तर मंगळवारपर्यत 286 रुग्ण आढळून आले आहेत तर 18 रुग्णाचा मुत्यू झालेला आहे.