जत‌ तालुक्यात 5 जणांचा मुत्यू | कोरोनाची भिती कायम ; नवी रुग्णसंख्या उतरली,मुत्यू दर कायम

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोनामुळे मुत्यूची संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत,पुन्हा रविवारी पाच रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाल्याने भिती कायम आहे.
तालुक्यात दुसरीकडे 32 नवे पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.
तालुक्यातील कोरोना कमी होतानाचे चित्र दिलासादायक आहे.मात्र मुत्यू होणारी संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. आजपर्यत तब्बल 250 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.तालुक्यात सध्या 650 रुग्ण उपचाराखाली आहेत. तर रविवारी 52 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यातील रुग्णसंख्या रविवार अखेरपर्यत 10,626 वर पोहचली आहे तर 9,731 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.जत शहर,डफळापूर, शेगाव,बिळूर येथे सातत्याने नवे रुग्ण आढळून येत असल्याने अद्यापही भिती कायम आहे.


रविवारचे रुग्ण,जत 5,वळसंग 1,शेड्याळ 1,करजगी 1,निगडी खु 1,रामपूर 1,अचनहळ्ळी 2,शेगाव 4,बागलवाडी 4,कोसारी 1,वाळेखिंडी 1,अंतराळ 1,वायफळ 1,हिवरे 1,येळदरी 1,खोजानवाडी 2,जा.बोबलाद 2,कुलाळवाडी 1,बोर्गी बु. 1 असे 32 रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान सांगली जिल्ह्यात  633 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मुत्यू झाला आहे.तर 949 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात 8,609 रुग्ण उपचाराखाली आहेत.
दरम्यान नव्या नियमानुसार सर्व बाजार पेठा खुल्या झाल्या आहेत.त्यात कोरोना नियम पायदळी तुडविले जात आहेत. सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे, मास्क गायब झाला आहे. कोरोना गेला या अंहभावात नागरिक वावरत आहेत.त्यामुळे पुन्हा तिसरी लाट आल्यास वावगे वाटू नये.