500 कोटीचा विशेष निधी आणा | या नेत्यांनी आमदारांना केले आवाहन

जत,संकेत टाइम्स : जत शहरात 500 कोटीचा स्व:ताच्या ताकतीवर विशेष निधी आणून विकास कामे मंजूर करा,त्यांचे तुमच्याहस्ते उद्घाटन करू,शिवाय आम्ही तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू,असे आवाहन आमदार सांवत यांना माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी केले.

जत शहरातील नगरपरिषदेच्या विविध विकास कामाचे भूमिपुजन शिंदे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते संपन्न झाली.यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे,उमेश सांवत,उत्तम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले,शहरात‌ आता होत असलेली कामे ही रुटींगची आहेत.त्यासाठी नगरसवेक पाठपुरावा करतात. शासनाकडून यासाठी हमखास निधी येतो असतो.त्यातही आपले आमदार आम्ही निधी आणला म्हणून उद्घाटने करत आहेत.आमचे‌ त्यांना सांगणे आहे,त्यांना जत‌ शहरात शासनाकडून पाचशे कोटीचा विशेष निधी आणावा.त्यातून होणाऱ्या‌ कामाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करू,आम्हीही या कार्यक्रमात सामील होऊ.


जत नगरपरिषदेकडून मंजूर झालेल्या रस्ता कामाचे भूमिपुजन करण्यात आले.