जत तालुक्यात मंगळवारी 38 नव्या रुग्णाची नोंद | जिल्ह्यातील संख्याही उतरणीला

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवार 38 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.तालुक्यातील एकूण कोरोना बाधित 10,459 पोहचली आहे.
मंगळवारी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत कोरोनाचा प्रभाव काहीअंशी खालावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन महिन्यात जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता.मात्र 
गेल्या पंधरवड्यात कोरोना रुग्णाचा आलेख उतरणीला लागला होता.अखेर गेल्या चार दिवसापासून नवे कोरोना बाधित संख्या 50 च्या आत आली आहे.
जत 5,निगडी बु.1,


रामपूर 6,तिप्पेहळ्ळी 1,डफळापूर 1, खलाटी 1,जा.बोबलाद‌ 3,राजोबावाडी 2,येळवी 1,माडग्याळ 1,गुळवंची 3,कोसारी 1,शेगाव 2,हिवरे 1,संख‌ 2,मुंचडी 1,बिळूर 5,मेंढिगिरी 1 असे‌ मंगळवारी एकूण 38 रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात मंगळवारी 78 सह 9,492 कोरोना मुक्त झाले आहे.सध्या 730 जण उपचारा खाली आहेत. तर 237 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 901 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.तर 20 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.889 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9,032 वर नोंद झाली आहे.