धोका कायम, नवे रुग्ण 33 | ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात तालुक्यातील  गावात 32 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 58 जणांनी कोरोनावर मात केली आहे.519जणांवर उपचार सुरू आहेत.


अधिकाधिक चाचण्या करून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 
जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट काहीसा स्थिर आहे,मात्र कमी होत नसल्याचे स्पष्ट आहे.दररोजची पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दहाच्या आत येण्याची गरज आहे.

शुक्रवार अखेरपर्यत 10825 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे,10054 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.252 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.


रामपूर 3,वळसंग‌ 1, सोरडी 2,माडग्याळ 2,करेवाडी को 3,गुलगुंजनाळ 5,बेवनूर 3,गुळवंची 2,कोसारी 1,येळदरी 1,उंटवाडी 2,उटगीतांडा 4,दरिबडची‌1,दरिकोणूर 1,सिध्दनाथ 1,पांढरेवाडी 1 असे 32 रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत.