जत तालुक्यात शनिवारी 32 नवे रुग्ण,एकाचाही मुत्यू नाही

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी नव्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे.तर 52 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.तालुक्यात गेल्या चार दिवसापासून कोरोनाचा प्रभाव अखेरीला लागल्याचे चित्र नव्या रुग्णाच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.
तालुक्यात शनिवार अखेरपर्यत बाधित आकडा 10,626 पोहचला आहे, तर 9,731 जण कोरोनामुक्त झाले आहेत.दुसरीकडे दोन्ही लाटेत तब्बल 245 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.सध्या 650 रुग्ण उपचाराखाली आहेत.


जत‌ 5,वळसंग 1,शेड्याळ 1,काराजनगी 1,निगडी खु 1,रामपूर 1,अचकनहळ्ळी 2,शेगाव 4,बागलवाडी 4,कोसारी 1,वाळेखिंडी 1,अंतराळ 1,वायफळ 1,हिवरे 1,येळदरी 1,खोजानवाडी 2,जा.बोबलाद 2,कुलाळवाडी 1,बोर्गी बु 1 असे 32 रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत.दरम्यान विकएंड निर्बंधाची तालुक्यात व्यापाऱ्यांनी स्वंयपुर्तीने आपली दुकाने बंद‌ ठेवून कडक अंमलबजावणी केली आहे.