तालुक्यातील रस्ते कामासाठी 3 कोटीचा निधी उपलब्ध ; आ.विक्रमसिंह सांवत

जत,संकेत टाइम्स : जत विधानसभा मतदार संघासाठी ग्रामविकास विभागाकडून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या विविध विकास कामासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जत तालुक्यात रस्तेविकास करिता हा निधी खर्च करण्यात येणार आहे, यामुळे तालुक्यातील अनेक दिवसापासून पक्के रस्त्याची मागणी मार्गी लागली आहे, अशी माहिती कॉग्रेसच्या कार्यालयातून देण्यात आली.

 मौजे सिद्धनाथ ता.जत येथील ग्रामपंचायत इमारत बांधणे, 25 लाख, मौजे जत,ता.येथील जत देवनाळ रोड पासून सुरेश कलमाडी त्यांच्या घरापासून पुढे जाणारा रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे, 10 लाख,मौजे कुंभारी ता.जत येथील सुनील जाधव वस्ती ते वसंत गणपती वस्ती पर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण करणे 10 लाख,मौजे सुसलाद ता.जत येथील पाटील वस्ती ते निम्बर्गी वस्ती पर्यंत रस्ता मुरमीकरण करणे 10 लाख ,


मौजे धुळकरवाडी ता जत येथील माळी वस्ती ते घोणसगी फार्म पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे 15 लाख,मौजे गुड्डापुर तालुका जत येथील जत येथील मल्हाड वस्ती ते थोरात घर पर्यंत मुरमीकरण करणे 10 लाख, मौजे बाज ता. जत येथील ईश्वर गडदे घर ते रावसाहेब गडदे घर पोल्ट्री शेड पर्यंत रस्ता मुरमीकरण करणे 10‌ लाख,मौजे मोरबगी तालुका जत येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा ते औराळ वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 30 लाख,मौजे. माडग्याळ तालुका जत येथील अंकलगी रस्ता ते पुजारी वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे 10 लाख,मौजे तिकोंडी तालुका जत येथील तिकोंडी ते काळे वस्ती रस्ता खडीकरण करणे 15 लाख,मौजे मुचंडी तालुका जत येथील टोळबोळवाडी ते शिंदे वस्ती मुरमीकरण व मोरी बांधणे‌ 20 असा निधी उपलब्ध झाला आहे.