सांगली जिल्हा स्तर 3 ; प्रतिबंधात्मक आदेशांना 28 जूनपर्यंत मुतदवाढ

सांगली कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर व व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी नुसार सांगली जिल्ह्यात स्तर 3 (level 3) साठी निर्धारित केलेले प्रतिबंधात्मक आदेश दि. 21 जून 2021 रोजीचे पहाटे 5 पर्यंत लागू करण्यात आले होते. दि. 17 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर 5 टक्के पेक्षा जास्त पण 10 टक्के पेक्षा कमी आहे आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी 25 टक्के पेक्षा जास्त पण 40 टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे स्तर 3 प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 28 जून 2021 रोजीचे पहाटे 5 वाजेपर्यंत मुतदवाढ दिली आहे.