जतेत सोमवारी नवे 24 रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 24  नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.तालुक्यातील संख्या यामुळे 10,686 वर पोहचली आहे.तर 9,826 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


सध्या 610 रुग्ण उपचाराखाली आहेत.
सोमवारी तालुक्यातील एकाही रुग्णाचा मृत्यु झालेला नाही.जत 2,रामपूर 1,शेड्याळ 2,निगडी खु 1,कुणीकोणूर 1,व्हसपेठ 1,माडग्याळ 1,उमदी 1,शेगाव 2,गुळवंची 2,वाळेखिंडी 1,कोसारी 3,बेवनूर 4,कुंभारी 2 असे 24 रुग्ण आढळून आले आहेत.