अंकले प्रकरणातील संशयिताला 23 जून पर्यंत कोठडी


जत,संकेत टाइम्स : एका मनोरुग्ण पिडितेवर अतिप्रंसग केल्या प्रकरणातील संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. दादासो लक्ष्मण दुधाळ (रा.अंकले) असे संशयिताचे नाव आहे.अधिक माहिती अशी, चार दिवसापुर्वी एका 20 वर्षीय मनोरुग्ण पिडितेवर 50 वर्षीस संशयित दादासो दुधाळ याने अतिप्रंसग केला होता.


पिडितेच्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जत पोलीसात धाव घेतली होती.पिडितेच्या फिर्यादीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.दरम्यान घटनेपासून संशयित दादासो दुधाळ हा फरारी होता.पोलीसांनी त्यांचा माग काढत सोलापूर मधून त्याला ताब्यात घेतले आहे.पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश मोहिते,अगतराव मासाळ, संतोष कुंभार,सतीश माने,उमर फकीर, दिलीप कोळी आदीजणानी सापळा रचून दादासो लक्ष्मण दुधाळ याला ताब्यात घेतल आहे.


दुधाळ याला जत न्यायालयात उभे केले असता त्याला न्यायालयाने 23 जून पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महेश मोहिते करत आहेत.