जत‌ नगरपरिषदेवर 2022 ला माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असेल ; उमेश सांवत | स्विकृत नगरसेवक पदाचा राजिनामा

 

 
जत,संकेत टाइम्स : जत‌ नगरपरिषदेवर सन 2022 ला माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील सत्ता असेल,असे प्रतिपादन स्विकृत्त नगरसेवक उमेश सांवत यांनी केले.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांनी गुरुवारी स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाअधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे सादर केला,त्यानंतर ते बोलत होते.माजी आमदार विलासराव जगताप यांनी बुधवारी भाजपचे नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांची बैठक आयोजित केली होती.


या बैठकीला भाजप तालुका अध्यक्ष सुनील पवार भाजपचे काही नगरसेवक व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. मात्र या बैठकीला माजी विरोधी पक्षनेते विजय ताड उपस्थित नव्हते.बैठकीत नगरसेवक सावंत यांचा राजीनामा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. माजी आमदार यांच्या आदेशप्रमाणे सावंत यांनी पदाचा राजीनामा गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.


इच्छुक स्वीकृत नगरसेवक पदाच्या शर्यतीत खोकीदार संघटनेचे अध्यक्ष गौतम ऐवळे,भाजप शहराध्यक्ष आण्णा भिसे यांचे लहान बंधू मिथुन भिसे,शिवनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष पापा कुंभार, मुस्लीम संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष मकसुद नगारजी यांची नावे असल्याची चर्चा आहे.पण माजी आमदार यांनी स्विकृत नगरसेवकपदी कोणाला संधी द्यायची हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.सध्या तरी गौतम ऐवळे, मिथुन भिसे यांची नावे या पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.


राजीनामा दिल्यानंतर यावेळी उमेश सावंत म्हणाले की,आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी तीन वर्षे नगरसेवक पदाची संधी दिली,या कालावधीत प्रभाग क्रंमाक तीन मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबद्दल व सत्ताधारी यांच्या चुकीच्या निर्णया विरोधात आवाज उठवला.माझ्या कार्यकाळात समधानी आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमचे नेते माजी विलासराव जगताप यांनी मोठे राजकीय पाठबळ दिले.


त्यांच्यामुळे निरनिराळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.त्यांच्या नेतृत्वाखाली 2022 च्या नगरपरीषद निवडणुकीत जत नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


स्विकृत्त नगरसेवक पदाचा उमेश सांवत यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे राजिनामा दिला